राष्ट्रीय उत्पन्न (National Income, GDP, NDP, GNP, NNP)

What is GDP, NDP, GNP, NNP

हे काय आहे, हे एकमेकांपासून किती वेगळे आहेत, याचा उपयोग काय आणि कुठे होतो, खूप गोंधळात टाकणारे आहे त्यामुळे व्यवस्थित वाचा आणि पूर्ण Concept Clear करा नेहमीसाठी. 

आधी याची पार्श्वभूमी पाहुयात त्यानंतर लगेच याच्या Concept कडे वळूयात

* पार्श्वभूमी

१) दादाभाई नौरोजी – poverty & unbritish rule in India (राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न)

दरडोई उत्पन्न २० रु  (१८६७-६८)    ( कृषी क्षेत्र )

२) Dr. V.K.R.V. राव – ‘National Income In British India’  (राष्ट्रीय उत्पन्न शास्त्रीय पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न)

शास्त्रिय पद्धतीने मापन

७६ रु.  राष्टीय उत्पन्न – १९२५ – १९२९

After Independence

४ Aug.  १९४९ – राष्टीय उत्पन्न समितीची स्थापना

अध्यक्ष – P.C महालनोबीस, Prof. D.R गाडगीळ, D.r. V.K.R.V. राव (सदस्य) (१९५४ अहवाल सादर)

दरडोई उत्पन्न  २४६.९० रु.  (१९५० – ५१)

समितीच्या शिफारसीनुसार : १९५० मध्ये ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण’ (NSS) आणि केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (CSO) ची स्थापना

राष्ट्रीय उत्पन्न का मोजतात ?

१) देशाच्या आर्थिक स्थितीची वास्तविकता जाणून घेण्यासाठी

२) आर्थिक विकास नीती मूल्यमापन करण्यासाठी

३) भविष्यकालीन योजना बनवण्यासाठी

४) लोकांचे जीवन (स्तर) जाणून घेण्यासाठी

५) आर्थिक विकासाची गती निर्धारित करण्यासाठी

६) क्षेत्रीय विकासाची समीक्षा करण्यासाठी

७) प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्ष्रेत्रातील विकासाचे योगदान मोजण्यासाठी

राष्ट्रीय उत्पन्न (National Income)

GDP – Depreciation (घसारा ) = GNP (राष्टीय उत्पन्न)

१) GDP -> स्थूल देशांतर्गत उत्पन्न

* GDP म्हणजे काय?

आपण आपल्या देशात तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीचे (वस्तू+ सेवा) पैसे (मूल्य).

(देशांतर्गत = देशातील)

प्रत्येक गोष्ट म्हणजे उत्पादने आणि सेवा.

२) GNP -> निव्वळ स्थूल राष्ट्रीय उत्पन्न

GNP म्हणजे काय?

आपण आपल्या देशामध्ये तयार केलेल्या प्रत्येक गोष्टीचे (money value)  +  परदेशातून मिळवलेले उत्पन्न.

एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात.

अनिल कपूर अमेरिकेत जातात, मिशन इम्पॉसिबल 4 मध्ये एक रोल play करतात आणि  5 दशलक्ष डॉलर्स भारतात घेऊन येतात (हि रक्कम भारताच्या जीएनपीमध्ये मोजली जाईल.)  +  Gary christian cricket coach  यांना बीसीसीआयकडून 50 लाख रुपये मिळतात आणि ते S.Africa येथील त्यांच्या कुटूंबाला पाठवतात (दक्षिण आफ्रिकन लोक त्यांच्या जीएनपीमध्ये याची गणना करतील)

त्याचप्रमाणे अमेरिकन लोक त्यांची जीएनपीची मोजणी करीत असतांना जे अनिल कपूरने डॉलर भारतात पाठवले त्याची वजाबाकी करणार आणि भारत ते आपल्या GNP मध्ये Add करणार.

Concept is the Power = Economics मध्ये Concept clear करण्यावर भर द्या, सूत्र (फॉर्मुला) च्या नादी लागू नका.

तर, (Formula) काय असेल?

एकूण राष्ट्रीय उत्पादन (निव्वळ स्थूल राष्ट्रीय उत्पन्न) = भारतात निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूचे money value  +  परदेशातून येणारे पैसे.

किंवा आपण सहजपणे सांगू शकता

जीएनपी = जीडीपी + परदेशातून येणारे पैसे – परदेशात जाणारे पैसे

३) NDP -> निव्वळ देशांतर्गत उत्पन्न

GDP – घसारा  = NDP  

४) NNP -> निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न

GNP – घसारा = NNP

जीडीपी (GDP) मोजण्याच्या किती व कोणत्या पद्धती आहेत?

जीडीपी मोजण्याचा तीन पद्धती आहेत

जीडीपीची गणना कशी केली जाते आणि या उत्पन्न, उत्पादन आणि खर्चाच्या पद्धती काय आहेत.

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत

१) उत्पादन पद्धत (Production Method)

वस्तू + सेवा (प्रत्येक टप्प्यावर मूल्य Add केले जाते म्हणजेच value addition) यांची गणना केली जाते

उत्पादित प्रत्येक वस्तूचे एकूण पैसे मूल्य (प्रत्येक टप्प्यावर मूल्य Add केले जाते म्हणजेच value addition)

उदा. शेतकर्‍याने गहू पिकवला आणि त्यातील 100 किलो 2000 रू. ला विक्रेत्याला विकला  (मूळ मूल्य २००० रु.)

    विक्रेत्याने ते गहू पीठ गिरणीत नेऊन, पीसून पीठ २५०० रुपयांना बेकरीवाल्याला विकला. (मागील खरेदीमध्ये +500 मूल्य जोडले गेले)

   बेकरीवाल्याने ब्रेड्स, कुकीज आणि बिस्किट बनवून एकूण उत्पादन final 35०० रुपयाला त्याच्या अंतिम ग्राहकांना विकले. (मागील खरेदीमध्ये +1000 मूल्य जोडले गेले)

येथे एकूण ‘जीडीपी’ म्हणजे काय मोजले जाईल?

2000 + 2500 + 3500 = 8000 रुपये? अजिबात नाही! आपणास जोडलेले मूल्य पहावे लागेल.

तर, येथे एकूण पैसे मूल्यः 2000 + 500 + 1000 = 3500.

सर्व गहू बेकरच्या भट्टीमध्ये जात नाही. त्यातील काही बिअर बनविण्यास जातील, काही सामान्य घरात पोळी बनवण्यासाठी वगैरे वापरात जाईल.

moral of the story = फक्त value addition झालेली किंमत GDP calculate करतांना मोजली जाईल. 

२) उत्पन्न पद्धत (Income Method)

यात कुटुंबाचे उत्पन्न मोजले जाते

उदा. जमिनीचे भाडे, व्यक्तीचा पगार, व्याज, नफा इ.

३) खर्च पद्धत (Expenditure Method)

देशासाठी किंवा देशात केलेला खर्च/गुंतवणूक

उदा. लोकांकडून केलेली गुंतवणूक (in share market & banks) आणि खर्च, सरकारकडून केलेला संरक्षण खर्च, आयात, निर्यात इ.

* भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजतांना -> उत्पादन + उत्पन्न यांचा एकत्रित वापर केला जातो.

वरील माहिती वाचल्या नंतरही काही GDP समजण्यास काही अडचण असल्यास किंवा काही प्रश्न असतील तर बिनधास्त खाली Comment करा

आणि हो अजून पर्यंत तुम्ही आमचे Telegram Channel Join केले नसल्यास लगेच Join करा, कारण आम्ही जेव्हा अशा पद्धतीचे Informative article Post करू तेव्हा तुम्हाला त्याचे लगेच Notification मिळेल.

आणि इतर सर्व Subjects च्या Class Notes PDF स्वरूपात तुम्हाला मोफत Provide केल्या जाईल.

3 thoughts on “राष्ट्रीय उत्पन्न (National Income, GDP, NDP, GNP, NNP)”

Leave a Comment