All Post Under MPSC Exam

1.MPSC राज्य सेवा परीक्षा

आपल्याला माहित आहे की, MPSC ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय परीक्षा आहे. हजारो उमेदवारांपैकी सर्वोत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यासाठी MPSC ही परीक्षा Conduct करते. मला वाटते की तुम्हाला उपजिल्हाधिकारी, एसीपी / डीएसपी, बीडीओ आणि तहसीलदार इ. माहित आहेत. या प्रकारच्या पदे (अधिकारी) तुम्हाला या परीक्षेतून मिळतील.

परंतु यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणती आणि किती Posts आहेत तुम्हला माहिती नसेल तर जाणून घ्या………..

List of all examination comes under MPSC राज्यसेवा Exam Class A And Class B

MPSC-Rajyaseva-Exam-information-in-Marathi Download

आपल्याला माहित आहे की MPSC परीक्षेत बरीच पोस्ट्स आहेत पण किती?

उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार अशी 24 पदे आहेत. या परीक्षेत सर्व पदे समान नाहीत; ते Class ‘A’ आणि Class ‘B’ Posts आहेत. परंतु, सर्व पोस्ट्स सर्व पदवीधरांसाठी नसतात, म्हणजे जवळपास 6 posts त्या विषयात स्पेशलायझेशन आवश्यक आहे. किंवा ही posts मिळवण्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ट पदवीसह उत्तीर्ण व्हावे लागते.

2. MPSC Subordinate Exam (Group “B” Exam) (ASO-STI-PSI)

Official Exam Information Of (ASO-STI-PSI) Download

  • MPSC Assistant Section Officer Exam (ASO)

  • MPSC State Tax Inspector Exam (STI)

  • MPSC Police Sub-Inspector Exam (PSI)

3. MPSC Group “C” Exam (ESI-TA-CT).

MPSC Group “C” Exam Information In Marathi Download

  • MPSC Excise Sub Inspector Exam (ESI)

  • MPSC Tax ASSISTANT Exam (Tax Assistant)

  • MPSC Clerk Typist Exam (Clerk Typist)

4. MPSC Engineering Services Exam (CE-EE-ME)

4. MPSC Engineering Services Exam All Information Download

  • MPSC Civil Engineering Exam (CIVIL)

  • MPSC Electrical Engineering Exam (ELECTRICAL)

  • MPSC Mechanical Engineering Exam (Mechanical)

 

5. MPSC Agriculture Services Exam

MPSC Agriculture Services Exam Official Information Download

6. MPSC Forest services Exam

6. MPSC Forest services Exam Official Information Download

7. MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam

7. MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam Official Information Download

8. MPSC Technical Assistant Exam

8. MPSC Technical Assistant Exam Official Information Download

9. MPSC Judicial Services (JMFC) Exam

9. MPSC Judicial Services (JMFC) Exam Download

दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा

१. संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील :-

१.१ राज्य शासनाच्या न्यायिक सेवेतील दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार तसेच पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात.

१.२ पदांचा तपशील:-

(१) संवर्ग :- राज्य शासनाच्या न्यायिक सेवेतील राजपत्रित, गट-अ ची पदे.
(२) नियुक्तीचे ठिकाण :- न्यायिक सेवेमध्ये महाराष्ट्रात कोठेही नियुक्ती होईल.
(३) वेतनबँड : रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय भत्ते. (२) वेतनश्रेणीमध्ये शासनाच्या धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे.
(४) उच्च पदावर बढतीची संधी :- ज्येष्ठता व पात्रतेनुसार महाराष्ट्र न्यायिक सेवेतील वरिष्ठ पदांवर .

१.३ जाहिरात / अधिसूचनेमध्ये भरावयाच्या पदांचा तपशील देण्यात येईल. पदसंख्या शासनाने कळविल्यानुसार राहील व विज्ञापनेत प्रसिद्ध केली जाईल.

१.४ महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम, २००८ आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी सदर नियमामध्ये केलेल्या सुधारणानुसार प्रस्तुत प्रकरणी पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

२. परीक्षेचे टप्पे :- तीन. (१) पूर्व परीक्षा-१०० गुण. (२) मुख्य परीक्षा-२०० गुण. (३) मुलाखत-५० गुण.

३. अर्हता

३.१ वकील, अॅटर्नी किंवा अधिवक्ता यांचेकरिता :-

(एक) जाहिरात / अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दिनांकास वय २१ वर्षांपेक्षा कमी व ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

(दोन) जाहिरात / अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दिनांकास विधी शाखेतील पदवी आणि मुंबई उच्च न्यायालयातील किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयामधील वकील, अॅटर्नी किंवा अधिवक्ता म्हणून ३ वर्षांचा वकिली व्यवसाय.

(तीन) पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावरील महाराष्ट्रातील सेवा न्यायालयीन व्यवसाय म्हणून समजली जाईल.

(चार) मराठी भाषा उत्तम रितीने बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक

(पाच) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराजवळ असणे आवश्यक

(सहा) मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक.

३.२ नवीन विधी पदवीधरांकरिता :-
(एक) जाहिरात / अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दिनांकास वय २१ वर्षांपेक्षा कमी व २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(दोन) विधी शाखेतील पदवी अभ्यासक्रमाचे प्रत्येक वर्ष प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करुन प्राप्त केली असली पाहिजे आणि
विधी पदवीच्या अंतिम वर्षास किमान ५५% इतके गुण पहिल्या प्रयत्नात प्राप्त करणे आवश्यक किंवा विधी मधील
पदव्युत्तर पदवी किमान ५५% इतक्या गुणांनी उत्तीर्ण झाला असणे आवश्यक.
(तीन) मराठी भाषा उत्तम रितीने बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक.
(चार) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराजवळ असणे आवश्यक.
(पाच) मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे.

३.३ उच्च न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गाचे (Ministerial Staff) सदस्य, उच्च न्यायालयास दुय्यम असलेल्या न्यायालयाच्या सेवा कर्मचारी वर्गाचे (Ministerial Staff) सदस्य, मंत्रालयाच्या विधि व न्याय विभागाच्या विधि उप-विभागामध्ये विधि सहायक आणि त्यापेक्षा उच्च पदावर काम करणा-या कर्मचारी वर्गाचे सदस्य, उच्च न्यायालय, शहर दिवाणी न्यायालय आणि जिल्हा न्यायालये यामधील सरकारी वकीलांच्या कार्यालयातील सेवा कर्मचारी वर्गाचे (Ministerial Staff) सदस्य यांचेकरिता :
(एक) जाहिरात / अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दिनांकास वय २१ वर्षांपेक्षा कमी व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
(दोन) विधि पदवी प्राप्तीनंतर जाहिरात/अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या दिनांकास किमान तीन वर्षांची सेवा झालेली असणे
आवश्यक.
(तीन) मराठी भाषा उत्तम रितीने बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक.
(चार) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराजवळ असणे आवश्यक.
(पाच) मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे.

३.४ प्रस्तुत पदाच्या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत संपादन केलेली अर्हता व अनुभव सदर पदासाठी पात्रता तसेच पुढील निवडीसाठी विचारात घेण्यात येईल.

३.५ सक्षम विद्यापीठाकडून संबंधित परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकास शैक्षणिक अर्हता संपादन केली आहे, असे समजण्यात येईल.

३.६ लेखी परीक्षेच्या कालावधीत नक्कल किंवा गैरवर्तणूक केलेल्या किंवा फौजदारी केसेसमध्ये शिक्षा झालेल्या किंवा न्यायिक सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या /काढून टाकलेल्या किंवा बडतर्फ केलेल्या किंवा कोणत्याही पदाचा प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण न करणारा अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी अपात्र ठरविलेला उमेदवार प्रस्तुत स्पर्धा परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरविला जाणार नाही.

४. शुल्क (फी):-
४.१ प्रस्तुत परीक्षेकरिता आयोगाकडून आकारण्यात येणारे शुल्क खालीलप्रमाणे आहे :-

४.२ वि.जा.(अ),भ.ज.(ब),वि.मा.प्र.,भ.ज.(क),भ.ज.(ड), इ.मा.व. तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटात (क्रीमी लेअर) मोडणाऱ्या उमेदवारांना आरक्षणाचा व वयोमर्यादेचा फायदा देय नसल्याने त्यांनी अमागास उमेदवारांप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

४.३ उन्नत व प्रगत गटासंदर्भातील (क्रीमी लेअर)उत्पन्नाची मर्यादा तसेच अन्य तद्अनुषंगिक बाबी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार राहतील.

४.४ दिनांक १ जानेवारी, १९६४ ते २५ मार्च,१९७१ या कालावधीत पूर्व पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतामध्ये आलेल्या आणि दिनांक १ जून,१९६३ नंतर स्थलांतर करून भारतात आलेल्या मूळचे भारतीय असलेल्या श्रीलंकेतील स्वदेश प्रतावर्ती उमेदवारांनी कोणतेही परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

पूर्व परीक्षा : –
परीक्षा योजना :-
प्रश्नपत्रिका:- एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

५.१.२ पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम:-

(१) कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (२) सिव्हिल प्रोसिजर कोड (३)एव्हिडन्स Act (४) ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी Act (५)स्पेसिफिक रिलिफ Act (६) महाराष्ट्र रेंट कंट्रोल Act (७) लिमिटेशन Act (८) कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (९) इंडियन पिनल कोड (१०) लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स Act and पार्टनरशिप Act

५.२ पूर्व परीक्षेचा निकाल :-

५.२.१ वस्तुनिष्ठ स्वरुपांच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.

५.२.२ पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेकरिता उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या उददेशाने घेण्यात येईल. गुणवत्तेनुसार एकूण पदसंख्येच्या साधारणपणे दहा पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येतील.

५.२.३ मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पर्याप्त उमेदवारांची संख्या ठरविण्याकरीता आयोगाकडून पूर्व परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या किमान सीमारेषा (cut off line) किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणा-या उमेदवारांना त्यांनी पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ते विहित अटीची पुर्तता करतात, असे समजून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरीता पात्र समजण्यात येईल.

५.२.४ पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टिने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या अभिवेदनावर कार्यवाही केली जात नाही.

५.२.५ पूर्व परीक्षेच्या अर्हतामानाच्या आधारे (cut off line) मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

लगेच Share करा

Leave a Comment