Mpsc चा अभ्यास करताना कुठून सुरुवात करावी | How to Start MPSC Study in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असताना विदयार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळणे थोडे जिकरीचे होऊन जाते. अभ्यास किती करता यापेक्षा तो कसा करता याला जास्त महत्व आहे.

जर तुम्ही MPSC Exam ची तयारी करत असाल आणि तुम्हाला कुठून सुरुवात करावी हे समजत नसेल तर हा लेख तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतो. चला तर मग आपण आता सुरुवात कुठून करावी आणि विषयांचा क्रम काय असावा याबद्दल बोलू.

How to Start MPSC Study in Marathi

सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला अभ्यास करण्याची गोडी, एकटा आणि दररोज न चुकता ठरवलेला अभ्यास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्याचा अभ्यासक्रम पाहणे महत्वाचे ठरते कारण त्यामुळेच तुम्हाला नेमके समजते कि आपल्याला काय करायचे आहे.

तुम्हाला कोणत्या पदासाठी तयारी करायची आहे ते आधी मनाशी ठरवा. समजा तुम्ही तहसीलदार या पदासाठी तयारी करत असाल तर त्याचा MPSC Mains Exam Syllabus बघून घ्या त्यासाठी कोणती परिक्षा द्यावी लागेल ते आधी पाहणे महत्वाचे आहे. त्याचसोबत त्या पदासाठी लागणारी पात्रता वगैरे गोष्टी बघून आपण पात्र आहोत का हे पाहून घ्या.

जर तुम्ही सर्व परीक्षांची तयारी करणार असाल तर साधारणतः MPSC Mains Exam Syllabus पाहून अभ्यासाला सुरुवात करावी. कारण त्यामध्ये सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम कव्हर होईल असे मुद्दे दिलेले आहेत.

त्यानंतर आपल्याला त्यातला किती भाग परिचयाचा आहे हे पाहावे. त्यामध्ये आपण आधीपासून आपल्या प्राथमिक शाळेमध्ये जे शिकलो ते विषय आपल्याला दिसतील त्यातून आपण आपल्याला आवड असलेला विषय निवडायचे व त्याचा अभ्यासक्रम पाहून घ्यायचा आणि त्याचे स्टेट बोर्ड चे पुस्तके आधी वाचून काढायचे.

त्याने आपल्या संकल्पना स्पष्ट तर होतीलच व आपल्याला अजून गोडी निर्माण होईल कारण शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सोप्या पद्धतीने सर्व सांगितलेले असते तसेच हे आपण आधी शाळेमध्ये वाचलेले असते.

अभ्यास कसा करायचा

संपूर्ण अभ्यासक्रम ज्या पुस्तकामध्ये समावेश केलेला आहे असे एखादे पुस्तक घ्यायचे जसे कि, इतिहासासाठी ग्रोव्हर, भूगोल साठी सवदी इत्यादी. ज्या विषयामध्ये तुम्हाला रस निर्माण होतो त्या विषयापासून सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. काही लोकांना राज्यशास्त्र हा विषय सोप्पं जातो तर काहींना अर्थशास्त्र.

तुम्ही पदवी परीक्षेला जो विषय घेतलेला असतो त्या विषयापासून सुरुवात केली तरी चालते कारण त्यामध्ये आपला आधीपासूनच हातखंडा असतो पण हे सर्व करत असताना बाकीचे विषय मागे राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.

सर्वात आधी तुम्हाला सोप्पे वाटणाऱ्या विषयांचे गट करा. त्यानुसार प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम आणि MPSC Previous Question Papers याचे बारकाईने MPSC Question Papers Analysis करा आणि मग Maharashtra State Board Books वाचायला सुरुवात करा याने तुम्हाला त्यातील काय वाचायचे आणि काय सोडायचे हे बरोबर समजेल. अशाप्रकारे जर क्रमाने सुरुवात केली तर दीर्घकाळ तुम्हाला अभ्यास करायची ऊर्जा मिळेल.

हे देखील वाचा :

किती वेळ अभ्यास करायचा

हे गणित जुळायला हवे. जेव्हा नवीनच सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये एक ऊर्जा असते, आपण १०-१२ तास अभ्यास करतो पण काही कालांतराने हि ऊर्जा कमी होत जाते आणि अभ्यासाचे तास ५-६ तासावर येतात. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करतानाच हळू हळू अभ्यासाचा वेळ वाढवायला हवा.

एकदम १० तास बसण्यापेक्षा आधी ६ तास बसण्याची सवय लावा आणि हळू हळू एकेक तास वाढवा. तुमच्या क्षमतेनुसार मध्ये मध्ये ब्रेक घेऊन तुम्ही दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन करू शकता. ठरलेल्या दिवसात ठरलेला अभ्यास संपवण्याचा प्रयत्न करा.

या गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर आपल्याला परीक्षेत यश नक्की मिळेल. चला तर मग लागा अभ्यासाला. आपण पुन्हा भेटू पुस्तकांचे वाचन कसे करावे या नवीन Topic सोबत आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी.

FAQ | प्रश्नोत्तरे

Que. 1) MPSC Rajyaseva 2022 Exam Date

Ans : MPSC Rajyaseva Prelims Exam Date 2/Jan/2022
MPSC Rajyaseva Mains Exam Date : 7th, 8th, and 9th of May, 2022

Que. 2) MPSC PSI 2022 Exam Date

Ans : MPSC Combined Prelims Exam Date 26 February 2022
MPSC Combined Mains Exam Date May 2022

Que. 3) mpsc exam 2022 application form date

MPSC Rajyaseva Exam 2021 Notification Released

  • October 04, 2021

MPSC Rajyaseva 2021 Application Start Date

  • October 05, 2021

MPSC 2021 Last Date to Apply Online

  • November 02, 2021

MPSC Combine PSI-STI-ASO Exam Online Registration start

  • October 29 2021

Last Date of Registration Application

  • November 30, 2021

Que. 4) mpsc 2022 vacancy

ANS : MPSC Rajyaseva Total Vacancy : 290
MPSC Combine Exam Vacancy :

MPSC Combine Total Vacancy : 666

Leave a Comment