How to Study MPSC Exam in Marathi 2022

जीवनात सोपे काहीच नसते. काही मिळवायचे असेल तर खूप सारी मेहनत घ्यावी लागते. MPSC ची परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोप्पी नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करून अधिकारी व्हायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची संख्या या काही वर्षांमध्ये खूपच वाढली आहे.

खाजगी नोकरीत जाण्यापेक्षा सरकारी नोकरीत जाऊन समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या स्पर्धकांचा कल MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांकडे आहे. मात्र याची तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वापरावीत, क्लास लावावा का या प्रश्नांनीच विद्यार्थी हैराण होतात. स्पर्धापरीक्षेची त्यातूनही mpsc ची तयारी करू इच्छिणाऱ्या ध्येयवेड्या तरुणाईसाठी हा लेखनप्रपंच.

MPSC Exam Information in Marathi 2022

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवर्षी नागरी प्रशासनातील गट अ व गट ब या श्रेणीच्या पदासाठी एक साधारण परीक्षा घेते. अंतर्गत येणारे सर्व पदे आणि त्यांचा पगार अधिक माहिती येथे वाचा : MPSC All Posts & Salary

विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी , पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी mpsc वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन करते.

राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याचबरोबर प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.

अधिक माहिती येथे वाचा :

Mpsc द्वारे भरली जाणारी पदे :

Sr. No.PostsGroup/Level
1)१) उपजिल्हाधिकारीगट अ
2)२) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तगट अ
3)३) सहायक विक्रीकर आयुक्तगट अ
4)४) उपनिबंधक सहकारी संस्थागट अ
5)५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी
\गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)
गट अ
6)६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ)गट अ
7)७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषदगट अ
8)८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कगट अ
9)९) तहसीलदारगट अ
10)१०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीगट ब
11)११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवागट ब
12)१२) कक्ष अधिकारीगट ब
13)१३) गटविकास अधिकारीगट ब
14)१४) मुख्याधिकारी नगरपालिकागट ब
15)१५) सहायक निबंधक सहकारी संस्थागट ब
16)उपअधीक्षक, भूमिअभिलेखगट ब
17)उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कगट ब
18)सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क गट ब
19)नायब तहसीलदारगट ब

MPSC Exam हि तीन टप्प्यात होते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे आपणास माहितीच आहे. MPSC Prelims And Mains Exam Syllabus आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो.

How to clear MPSC Exam without Coaching

असा प्रश्न प्रत्येक या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात येत असतो खास करून नवीनच तयारी करणाऱ्या मुलांच्या मनात यामुळे गोंधळ उडू शकतो. क्लास लावला म्हणजे यश मिळेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असल्यास क्लास लावावाच लागतो या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे.

अशी बरीच मंडळी आहेत जे Class न लावता अधिकारी बनले आहेत. हा पण आपणास खरेच मार्गदर्शनाची गरज असेल व ते योग्य मार्गदर्शन आजूबाजूला नसेल, पैसे असेल, घरच्यांची काही हरकत नसेल तर खाजगी शिकवणी लावून मार्गदर्शन घेण्यास काहीच हरकत नाही.

नुकतीच सुरुवात करणाऱ्या मुलांनी अनिल दाभाडे सर लिखित mpsc सक्सेस मंत्र हे पुस्तक वाचावे. अगदी पेन कोणता निवडावा पासून ते मुलाखतीला सामोरे कसे जावे याचे संपूर्ण मार्गदर्शन सरांनी केले आहे. हे पुस्तक वाचून बेसिक माहिती मिळून जाते आणि अभ्यासाला एक दिशा मिळते.

How to study for mpsc

आता आपण अभ्यास कसा करावा आणि आपली अभ्यास पद्धती काय असावी हे पाहुया ज्यामुळे आपल्याला योग्य मार्गक्रमण करता येईल आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडेल.

सर्वात पहिले हे नक्की करा कि तुम्ही जो अभ्यास करणार आहेत ते तुम्हाला व्हायचे आहे का ? अशा परीक्षेसाठी लागणारी मेहनत करण्याची तयारी आहे का? तुमच्याकडे सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे संयम आहे का? अपयश पचवण्याची ताकद आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तरच सुरुवात करा. त्यासाठी तुम्हाला दिवसाचे १०-१२ तास वर्षभर द्यावे लागणार आहेत.

अभ्यासाची सुरुवात :

तयारी करताना सर्वप्रथम Maharashtra State Board Books ५ वी ते १० वी पर्यंत वाचावीत. त्यानंतर NCRT ची पुस्तके वाचावीत. या मधील संकल्पना चांगल्या करून घ्याव्यात. त्यानंतर MPSC Syllabus आणि MPSC Previous Year Question Papers पाहावेत. कोणतीही एक MPSC Topper Book List पाहावी त्यानुसार पुस्तके निवडावी.

उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपीनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत साठी बिपीनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल- सवदी, विज्ञान आणि तंत्रज्ञान रंजन कोळंबे. तसेच रोजच्या रोज पेपर २ म्हणजेच CSAT चा सर्व करावा. चालू घडामोडी साठी लोकसत्ता पेपर चा वापर फायदेशीर ठरतो किंवा एखादे मासिक सुद्धा चालू शकते.

MPSC Study Whole Day Planning

कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर व्यवस्थित नियोजनबद्ध अभ्यास हवा. दिवसभरातून १०-१२ तास अभ्यास झालाच पाहिजे. त्यामध्ये सामान्य अध्ययन ला ३ तास, CSAT ला ३ तास त्यामध्ये १ तास उतारा सराव साठी आणि २ तास बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्या सरावासाठी द्यावेत.

चालू घडामोडी साठी १ किंवा दीड तास द्यावा. सोबतच मराठी आणि इंग्रजी साठी प्रत्येकी एक एक तास द्यावा. आणि राहिलेले २ तास दिवसभर केलेली रिविजन करण्यासाठी द्यावेत. अशाप्रकारे दिवसभराचे नियोजन आपल्या सोयीप्रमाणे करावे.

MPSC Study Revision Tips 2022

स्पर्धापरीक्षेचा अभ्यास थोडा पण पक्का असला तरी चालेल पण जे केलंय ते उत्तम असल्यास आत्मविश्वास असावा. हा आत्मविश्वास उजळणी आणि उजळणीच्या सरावानेच येतो.

उजळणीसाठी २४-७-३० असा नियम ठरवता येऊ शकतो. २४ म्हणजे २४ तासाने एक रिविजन, ७ दिवसाने एक रिविजन, ३० दिवसांनी एक रिविजन. अशाप्रकारे केले तर अभ्यास खूपच प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. तसेच मागील सर्व परीक्षांना विचारलेल्या प्रश्नांचा सराव देखील करावा.

How to Start MPSC Study in Marathi 2022

सुरुवात नेहमी सोप्प्या विषयापासून करावी. म्हणजे अभ्यासातील रस जात नाही. अभ्यासक्रम पाहुन त्यानुसार पुस्तके गोळा करून वाचावीत. संकल्पना समजून घ्याव्या, रिविजन करावी आणि प्रश्न सोडवावे.

अभ्यासाची सुरुवात करताना तुम्ही भूगोल किंवा राज्यशास्त्र या विषयापासून करू शकता. तुम्हाला ज्या विषयाची आवड आहे तो विषय सुरुवातीला निवडल्यास फायदा होतो.

MPSC Topper Tips

Topper Tips…2020 MPSC Topper Mr. Prasad Chougule shared his Tips for MPSC Students…

सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक चा अभ्यास आहे त्यांनी सद्यस्थितीत Mains च्या अभ्यासक्रमावर फोकस केला पाहिजे. काही important टॉपिक जे आपण सध्या कव्हर करू शकतो ते खालील प्रमाणे.

MPSC Mains ???????? ????

इतिहास-

पूर्व परीक्षेच्या अभ्यासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही वाचला असेल. Mains च्या दृष्टीने तुम्ही खालील टॉपिक कव्हर करू शकता

I) महाराष्ट्राचा इतिहास- 11th old Maharashtra State Board + गाठाळ सर

II) स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास- बिपिन चंद्रा टॉपिक wise OR 12th NCERT India since independence
हा टॉपिक GS 1 मध्ये १२ -१४ marks la व GS 2 मध्ये पक्ष आणि दबावगट या टॉपिक मध्ये ४-५ मार्क्सला विचारला जातो. त्याच्या नोट्स काढून ठेवणे उत्तम आहे.

भूगोल –

हा मधील सर्वाधिक मार्क देणारा विषय आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राचा भूगोल चा अभ्यास तुम्ही आता करू शकता.
I) महाराष्ट्राचा भूगोल- सवदी सर ( map reading is very important here)
II) Remote sensing- मी ज्या pdf च्या नोट्स काढल्या होत्या त्याची लिंक शेअर करत आहे. Syllabus प्रमाणे तुम्ही देखील त्या पाहू शकता व नोट्स काढू शकता. Link: Here

Agriculture-

हा syllabus चा static part आहे. नॉन अग्री background chya मुलांनी आता एकदा कंटेंट वाचून notes काढून ठेवल्या तर mains साठी उपयोगी आहे.
• 11 th and 12 th State Board book- selected topic syllabus wise
• Arun Katyayan book
• हरी सरोदे सरांच्या नोट्स देखील उत्तम Revision sathi (Telegram vr search kara)

MPSC Mains ???????? ????

• यामधील कायदे हा घटक सोडून इतर सर्व घटक तुम्ही आता वाचून घेऊ शकता व त्यांच्या नोट्स काढू शकता.

• यामध्ये पक्ष आणि दबावगट, निवडणूका, अखिल भारतीय सेवा, जिल्हा आणि राज्य प्रशासन, पंचायत राज यासारखे polity २ चे घटक कव्हर करू शकता.

• या टॉपिक साठी तुम्ही इंटरनेटचा वापर करू शकता यामध्ये election commissionची वेबसाईट, राष्ट्रीय राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांची विकिपीडिया पेजेस, LBSNAA, SVPNPA etc यांच्या वेबसाईट बघू शकता.

• M Laxmikant यांचे governance in India हे पुस्तक देखील अत्यंत उपयोगी आहे.

• GS 2 हा विषय खूप जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे जेवढा syllabus तुम्ही आत्ता cover कराल तेवढा तुम्हाला mains साठी फायदा होईल.

MPSC Mains ???????? 3

माझे वैयक्तिक मत असे आहे की HR & HRD, पूर्व परीक्षेनंतर अभ्यासलेला जास्त चांगला आहे कारण यामध्ये खूप जास्त factual data विचारला जातो.

तरी तुम्ही किरण दिसले सरांच्या development या बुक ची रिविजन करू शकता. हे पुस्तक तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे.

MPSC Mains ???????? ????

Economics आजचा पेपर खूप जणांना अवघड वाटतो. तुम्ही आताच्या काळामध्ये इकॉनॉमिक्स च्या कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल.

• यासाठी Mrunal patel यांची You tube वरील व्हिडिओ series syllabus प्रमाणे बघू शकता.

• Economics चे mains sathi important असणारे topic जसे की सार्वजनिक वित्त व खर्च, आंतरराष्ट्रीय व्यापार, सहकार ,उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी अर्थशास्त्र यासारखे टॉपिक कव्हर करून त्याच्या नोट्स काढू शकता.

• यासाठी किरण देसले सरांचे (economics 1) हे पुस्तक उत्तम आहे.

• कृषी अर्थशास्त्र साठी vikaspedia website useful आहे.( Notes kadha)

Syllabus चे कोणतेही बर्डन घेऊ नका कारण जेवढा syllabus तुम्ही आता cover करणार आहे तो तुमच्यासाठी advantage असेल. आणि जेव्हा पूर्व परीक्षेची तारीख declare होईल तेव्हा तुम्ही पूर्णवेळ पूर्वपरीक्षेसाठी देऊ शकता. जेणेकरून आता तुमचा mains साठी चा maximum syllabus कव्हर होईल.

• ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेची थोडी भीती वाटत आहे त्यांनी दिवसातला 30 टक्के वेळ पूर्व परीक्षेसाठी देऊन इतर वेळामध्ये मुख्य परीक्षेची तयारी करू शकता. यामध्ये तुम्ही CSAT व GS तुमच्या convenience नुसार divide करू शकता.

• माझे वैयक्तिक मत असे आहे की gs2 व gs4 चा जेवढा maximum syllabus cover करता येईल तेवढा करून घ्यावा कारण हे स्कोरिंग subject आहेत.

• तुम्ही मराठी किंवा इंग्लिश objective साठी ही आता prepare करू शकता.यामध्ये दिवसातला एक ते दीड तास देणे अपेक्षित आहे. Objective grammar चा अभ्यास डेली बेसिस वर केलेला जास्त फायदेशीर ठरतो.

• ज्या विद्यार्थ्यांनी लॉक डाऊन मध्ये अभ्यासाची सुरुवात केली आहे त्यांनी बेसिक पुस्तके कव्हर करण्यावर भर द्यावा यामध्ये स्टेट बोर्ड ची पुस्तके एनसीईआरटी त्यासोबत Standard reference book चे reading करून understanding वर भर द्यावा सोबत previous year question देखील व्यवस्थित करून घ्यावे.

यशाचा कोणताही फिक्स असा राजमार्ग नाहीये. प्रत्येकाच्या अभ्यासाची पद्धत वेगळी असते. तुम्हाला जे सूट होईल त्यानुसार तुमचा प्लॅन रेडी असू दे. तुम्ही त्यामध्ये वैयक्तिक पातळीवर बदल देखील करू शकता.

How To Make Notes

सुरुवातीला नोट्स काढायला कधीच घेऊ नये नाहीतर त्या नोट्स न होता दुसरे पुस्तक च तयार होते. नोट्स या कमी शब्दात आणि कमी पानात असणाऱ्या हव्या. दोन किंवा तीन वेळा वाचन झाल्यावर ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत त्या लिहून काढाव्यात.

MPSC Topper Book List

कोणत्याची एका Topper ची MPSC Topper Book List तुम्ही फॉलो करू शकता.

FAQ | प्रश्नोत्तरे

Que. 1) How can I start my MPSC exam without coaching?

आयोगाच्या संकेतस्थळावरून अभ्यासक्रम आणि जुने पेपर काढून त्याप्रमाणे अभ्यास करावा.

Que. 2) How can I study for MPSC at home?

अभ्यासात सातत्य ठेवावे. व्यवस्थित नियोजन करून, रिविजन करावी, प्रश्नांचा सराव करावा.

Que. 3) Is it easy to clear MPSC?

हो, अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास परीक्षा पास करण्यास आवश्यक असतो.

Que. 4) Can I crack MPSC in 6 months?

खरे सांगायचे तर परीक्षेचा अभ्यासक्रम पहिला तर पूर्व परीक्षा ६ महिन्यात पास होऊ शकतो पण मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम पूर्ण होणे गरजेचे आहे.

Que. 5) Which newspaper is best for MPSC?

For Marathi Medium: लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स हि वृत्तपत्रे आणि एक इंग्रजी Newspaper Like Indian Express वाचावीत.
For English Medium: Indian Express And One Marathi Newspaper- लोकसत्ता.

Leave a Comment