अभ्यास करताना इंटरनेट चा वापर कसा करावा ?

आजकाल तंत्रज्ञानाचे युग सुरु सुरु आहे मग स्पर्धापरीक्षेच्या विदयार्थी तरी या तंत्रज्ञानापासून कसा लांब राहील! काही वेळा आपल्याला हवी असलेली माहिती आपण वाचत असलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळत नाही मग ती माहिती आपण इंटरनेट चा वापर करून मिळवतो.

इंटरनेट वरून माहिती मिळवताना ती माहिती ऑथेंटिक असणे गरजेचे असते त्यामुळे अनेक Official Website वरून आपणाला माहिती मिळू शकते. आताचेच उदाहरण घ्या ना! तुम्ही हा लेख वाचत आहेत ते इंटनेट वरच ना? त्यामुळे आज या लेखात आपण इंटरनेट चा वापर आपल्या अभ्यासात करून घेता येईल हे पाहू.

आपण काही Official Websites आणि इतर वेबसाईट्स ची माहिती घेऊ.

MPSC चा खास करून राज्यसेवा मेन्स चा अभ्यास करताना बऱ्याचदा आपण MPSC Toppers Book List मध्ये वाचतो कि काही मुद्दे त्यांनी इंटरनेट वरील माहितीचा अभ्यास केला आहे. खास करून टॉपर्स लोक विश्वासार्ह्य अशा सरकारी वेबसाइट्स चा वापर करताना दिसतात.

पण त्याचा वापर करताना सुद्धा ते मर्यादित, जे गरजेचे आहे तेव्हढाच वापर करतात. सरसकट सगळे वाचून काढत नाही. कारण अनावश्यक ठिकाणी इंटरनेट चा वापर करून आपण आपलाच वेळ वाया घालवत असतो.

इंटरनेट चा वापर कधी करावा

अभ्यास करत असताना एक तत्व नेहमी पाळायचे ते म्हणजे जी आपण पुस्तके वाचत आहोत त्यात जी माहिती दिली आहे त्यावर विश्वास ठेवावा. उगाच पुस्तकात माहिती दिलेली असताना काही लोक ती क्रॉस चेक करण्याच्या नादात इंटरनेट वर शोधात राहतात आणि वेळ वाया घालवतात.

त्यामुळे दिलेल्या पुस्तकावर विश्वास ठेवावा. आता काही घटक असे आहेत जे पुस्तकामध्ये दिलेले नाहीत किंवा कमी माहिती दिलेली आहे. त्यासाठी एक महत्त्वाचे संदर्भ पुस्तक म्हणून MPSC Previous Year Question Papers आणि MPSC Question Paper Analysis असलेले एक पुस्तक वापरू शकता.

या पुस्तकांमध्ये जर पुरेशी माहिती दिलेली असेल तर इंटरनेट चा वापर टाळावा यामुळे दोन गोष्टी होतील. जुन्या प्रश्नपत्रिकांचा आपला अभ्यास चांगला होईल आणि इंटरनेट चा वापर करण्यासाठी लागणार वेळही वाया जाणार नाही. आता काही माहिती तुम्हाला कुठेच मिळत नाही किंवा त्यासाठी तुम्हाला दुसरे एखादे पुस्तक विकत घ्यावे लागत आहे आणि ते घेणे परीक्षेत येणारी प्रश्नांची संख्या बघता संयुक्तिक नाही अशा वेळी इंटरनेट चा वापर करावा.

हे देखील वाचा :

इंटरनेट वापराची पद्धत

जिथे अत्यावश्यक आहे अशा ठिकाणी शक्यतो शासकीय वेबसाईट पाहाव्या आणि इंटरनेट चा वापर करण्यापूर्वी आपल्याला नेमके कोणते मुद्दे शोधायचे आहेत याची यादी करावी आणि वाचत असताना लगेच सर्च करून त्या विषयाच्या पुस्तकामध्ये किंवा नोट्स मध्ये नमूद करून ठेवायचे. म्हणजे दरवेळी इंटरनेट वर जाऊन वाचायची गरज नाही.

वेबसाइट्स

  • मंत्रालयाच्या वेबसाइट्स
  • Pib.nic.in
  • Prsindia
  • विकासपीडिया
  • Mrunal.org
  • MPSC च्या परीक्षांचे Update, MPSC Study Material आणि महत्वाचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी www.mpscstudy.in

इतर साईट्स

युट्युब वर पोस्ट इंडिपेन्डेन्स साठी प्रधानमंत्री सिरीज पाहू शकता. तसेच संविधान सिरीज मध्येही राज्यघटनेविषयी माहिती दिली आहे. गणिताचे तसेच बुद्धिमत्ताचे काही व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता.

काही टेलिग्राम चॅनेल्स वर देखील माहिती टाकली जाते परंतु त्याचा आउटपुट हा कमी असतो खास करून करंट अफेअर्स चा त्यामुळे टेलिग्राम वर एखाद्या पोस्ट होल्डर च्या नोट्स त्यांनी कशा काढल्या आहेत वगैरे पाहण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

तसेच आजकाल बरेच पोस्टहोल्डर नवनवीन मेंटॉरशिप प्रोग्रॅम चालवत असतात. त्यावर ते मार्गदर्शन करत असतात. Unacadmy सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर देखील बरेच लोक Paid मार्गदर्शन करत असतात. gktoday, byjus, iasbaba.com, insightsindia.com यांसारख्या वेबसाईट चा देखील उपयोग होऊ शकतो. या वेबसाइट्स upsc साठी आहेत परंतु mpsc मध्येसुद्धा याचा वापर होऊ शकतो.

अशा प्रकारे आपण इंटरनेट चा वापर विचारपूर्वक केला तर आपला फायदा होऊ शकतो. आणि अश्याच प्रकारचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी तुम्ही आमच्या Website ला Follow करू शकता. Google वर Search करा mpsc study.

Leave a Comment