MPSC 1st Rank Rohit Rajput Study Strategy

नमस्कार मित्रांनो आज आपण या Post मध्ये MPSC 1st Rank Rohit Rajput Study Strategy पाहणार आहोत जी Rohit Rajput Sir (2017) यांनी Share केलेली MPSC Rajyaseva Exam Study Strategy चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

MPSC 1st Rank Rohit Rajput Study Strategy

MPSC 1st Rank Rohit Rajput Study Strategy नेमका त्यांनी अभ्यास कसा केलेला होता, सर्व घटकांची तयारी सरांनी कशी केलेली होती आणि त्यांचा approach कसा होता. त्यांनी Share केलेल्या या Strategy तुन तुम्हाला अभ्यासाची योग्य दिशा नक्कीच मिळेल आणि यातून आपण शिकणार आहोत कि आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे.

MPSC 1st Rank Rohit Rajput Study Strategy तुन आपल्याला कळेल कि, तुम्ही अभ्यासात कुठे चुकत आहोत आणि आपल्याला नेमकं अभ्यासाच्या टप्प्यावर कोणते Changes करायचे आहे जेणेकरून आपण आपला विजय सुनिश्चित करू शकू.


Time pass करणाऱ्यांनी या क्षेत्रात येऊ नये-

MPSC हे प्रचंड स्पर्धा असलेले हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. आपल्याला पहिल्या प्रयत्नात जरी यश मिळाले
तरी एक संपूर्ण परीक्षाचक्र करिता सर्वसाधारणपणे १८ ते २० महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. तसेच
सुरवातीच्या कालवधीत सर्वसाधारणपणे दररोज ६-७ तास अभ्यास करावा लागतो. त्यामुळे ध्येयवादी असतांना
वास्तवाचे ही भान ठेवा.

तसेच ज्यांच्याकडे गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि कष्ट घेण्याची तयारी आहे त्यांना या क्षेत्रात यश मिळतो. काय
वाचावे काय वाचू नये, अभ्यास कसा करावा. कसा करू नये आणि किती depth मध्ये करावा या पाच गोष्टीचे
योग्य मार्गदर्शन असेल तर तुम्ही जॉब संभाळत. कोणतेही क्लास न लावता. गावाकडे राहून तुम्ही स्वयं-
अध्ययन च्या बळावर यश मिळवू शकतात.


Winners don’t do different things. they do things differently-

Quality of Study हे ‘Number of Hours पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास
करण्याचा पद्धतीमध्ये qualitative improvement आणण्यावर अधिक भर द्या. १०-१२ तास करण्याऐवजी ६-७
तासच पण quality अभ्यास करावा.


त्याचप्रमाणे तयारी करतांना नेहमी लक्षात ठेवायचे की, Toppers don’t read different books. they read
books differently. आपण पुस्तके किती व कोणते वाचतोय यापेक्षा ते पुस्तके आपण कसे वाचतोय या वर
अधिक भर दिला पाहिजे.


प्रश्नपत्रिका विश्लेषण वर भर द्या-

अभ्यासक्रम आणि गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून परीक्षेचा आवाका आणि प्रश्नांची depth समजून
घ्या. रोज २-३ तास जुन्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यास व आकलन करा. Once you have understood what the
examiner wants, coming in the final list is just a matter of procedure and application.


कमी पण दर्जेदार पुस्तकांचे वाचन-


दर्जेदार पुस्तकांना अद्वितीय महत्त्व आहे. आज बाजारात पुस्तक आणि संदर्भग्रंथाचा पूर आला आहे. पण जसे
mess चा डब्बा खाऊन कोणी पहेलवान होत नाही. त्याचप्रमाणे sub-standard पुस्तक वाचुन अधिकारी होता येत
नाही. त्यामुळे योग्य पुस्तकांची निवड करावी. तसेच परीक्षेत यश मिळविण्याकरिता साधारण २०-२५ पुस्तकांचे
अभ्यास पुरेसा आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या १७६० पुस्तकं मागे धावू नका. दहा पुस्तक एक वेळ
वाचण्याऐवजी एक पुस्तक दहा वेळ वाचा.


MPSC : Micro Notes काढा-


परीक्षेत यश मिळविण्यासाठी दर्जेदार मायक्रो-नोटस् स्वतः काढणे आवश्यक आहे. नोटस् काढण्यासाठी एक सूत्र
आहे- पुस्तकाचे १० पाठपोट पानांसाठी एक पाठपोट A4 size पानाचे नोटस्. म्हणजे ३०० पानांचे पुस्तक १५ A4
मध्ये लिहायचे. एकदा नोटस काढल्यानंतर मूळ पुस्तकाचे वापर केवळ संदर्भासाठी करावा.

तसेच नोटस काढण्याची घाई करू नका. कारण तयारीच्या सुरवातीला आपण नोटस बनवितांना पुस्तकांत जे आहे.
तेच जशाच्या तसे लिहून काढतो. त्यामुळे प्रत्येक पुस्तकचे आधी तीन-चार वेळा वाचन करावे. पहील्या तीन रिडींग
मध्ये केवळ महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित/ highlight करावे. पुस्तकातला विषय आपल्याला समजला आहे. याची
खात्री केल्यानंतरच नोटस काढायला सुरवात करावी.


MPSC Revision : उजळणीवर भर घा-


परीक्षेपूर्वी तुम्ही काढलेल्या मायक्रो-नोटस् चे १०-१५ वेळेस वाचन करा. तसेच मुख्य परीक्षेच्या एक महिन्या आधी
शक्यतो कोणतेही नवीन साहित्य वाचू नये. वाचलेले असूनदेखील परीक्षेत न आठवणे. एक सारखे दिसणाऱ्या दोन पर्यायांमध्ये confuse होणे.

किंवा उत्तर माहीत असून देखील silly mistakes होणे. हि उजळणी योग्यरित्या न झाल्याची लक्षणे आहेत. परीक्षेत silly
mistake करणे किंवा एकच चूक पुन्हा पुन्हा करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. त्यामुळे accuracy येण्याकरिता
उजळणीवर भरपुर मेहनत घ्या. नवीन अभ्यास साहित्य वाचतांना जुन्या अभ्यास साहित्याचे revision सतत चालू
ठेवावे.


तयारी करतांना शक्यतो दोन्ही भाषांमधल्या पुस्तकांचे वाचन करावे-

काही विषयांचे साहित्य/ पुस्तक प्रामुख्याने मराठी भाषेत उपलब्ध आहे. उदा. वाळंबे. कठारे. सवदी. लवटे. देसले
(भाग-१ व २). इत्यादी.
त्याचप्रमाणे काही विषयांचे साहित्य प्रामुख्याने इंग्रजीत भाषेत उपलब्ध आहे. उदा.- Pal and Suri, R.S.
Agrawal. ११° Ncen- Physical Geography. Arun Katyayan-Agriculture. Laxmikant. Politics in
India since independence. Government Websites. India year book. Wikipedia, etc.
त्यामुळे दोन्ही भाषांमधल्या पुस्तकांचे वाचन करणे श्रेयस्कर आहे.


Syllabus चा कोणताही topic skip करू नका.

जास्त weightage असेलेल्या घटकांवर आधी focus करा.
सर्व विषयांवर (descriptive आणि CSAT सह) एकसमान effons घ्या. इतिहास आवडतो, म्हणून फक्त
इतिहासाचे १० पुस्तक वाचायचं. अर्थशास्त्र आवडत नाही. म्हणून त्याचे फक्त १ पुस्तक वाचायचे. असे करू नका.


Internet चा मर्यादीत आणि संतुलित वापर खुप फायदेशीर ठरतो.

MPSC किंवा कुठल्याही Exam चा अभ्यास करतांना आवश्यक तेवढाच Internet चा वापर करायला पाहिजे, Internet मर्यादीत आणि संतुलित वापर खुप फायदेशीर ठरतो.


Don’t Read Books 1st Page To Last Page

कोणतेही पुस्तक कधीही सुरवातीपासून शेवटपर्यंत (end-to-end/ front cover to back cover) वाचण्याची आवश्यकता नसते. Selective and syllabus-wise reading is an an in itself. ही कला आत्मसात करा.


Last Words

Exam महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत अत्यंत पारदर्शक आणि विश्वासहार्य पद्धतीने निवडप्रक्रिया राबविली जात आहे. येथे शालेय शिक्षणाचे माध्यम. आर्थिक पार्श्वभूमी, किंवा graduation चा विषय matter करत नाही. गुणवत्ता आणि केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड होते. त्यामुळे कोणत्याही misconceptio ला, न्युनगंड ला किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता जिद्दीने तयारीला लागा.
wish you all the best.


See Also :


FAQ

1. How many hours study for MPSC?

MPSC चा अभ्यास करायचं म्हटलं कि dedication आवश्यक आहे आणि खूप vast syllabus असल्याने वेळ तर लागणारच. जर तुम्ही दिवसातून पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर तुम्ही दिवसाचे १० ते १२ तास अभ्यासाला द्या. किंवा ५ to ८ तास अभ्यासाला देऊ शकत असाल तर त्याचे नियोजन करा, आणि जर यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत असाल तर Well & Good. किंवा जर तुम्ही Working Person असाल तर रोजचे ४ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ अभ्यासाचे नियोजन करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक तासाचे नियोजन करावेच लागेल आणि हो किती तास अभ्यास करता यापेक्षा त्याचा दर्जा काय आहे हे महत्वाचे आहे.

2. Is MPSC exam difficult?

MPSC State Services exam म्हणजेच राज्य सेवा exam clear करणे सोपे नाही पण अशक्य सुद्धा नाही. या परीक्षेत Cut-off पद्धत असतो जो प्रत्येक Category नुसार वेगवेगळा असतो, ही परीक्षा आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन परीक्षेपेक्षा वेगळी असते.

3. How many students give MPSC every year?

2019 या वर्षाचा विचार केला तर, MPSC ने 431 posts ची जाहिरात काढलेली होती. आणि त्यात जवळपास साडेतीन लाख ते चार लाख विद्यार्थी prelims परीक्षेला बसलेली होती. त्यातल्या 6,825 विद्यार्थ्यांनी Mains Exam दिलेली होती. एक मुद्दा लक्षात असू द्या येथे Vacancy ची संख्या कमी अधिक होत असतात बहुतेक वेळेस जागा कमीच असतात.

4. What is the success ratio of MPSC?

Maharashtra Public Service Commission (MPSC) राज्य सेवा परीक्षेला बसलेल्यांपैकी एक टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी परीक्षा clear केलेली होती. म्हणजेच MPSC Exam चा success ratio जवळपास 1% किंवा त्यापेक्षा कमी आहे.


Leave a Comment