MPSC Combine Question Paper Analysis | महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ प्रश्नपत्रिका विश्लेषण

MPSC Combine Analysis: MPSC Combine Question Paper Analysis 2021

MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे परीक्षार्थी पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) या पदासाठी असणाऱ्या मुख्य परीक्षांना बसण्यासाठी पात्र ठरतात.

या तिन्ही पदांसाठी पूर्व परीक्षा एकच असते पण मुख्य परीक्षा वेगळी द्यावी लागते. नुकतीच ही बहुप्रतीक्षित परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडली. ८०६ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यातील ६७ जागा सहाय्यक विभागीय अधिकारी, ८९ जागा राज्य कर निरीक्षक तर ६५० जागा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी होत्या.

पूर्व परीक्षेमध्ये १०० प्रश्न १०० गुणांना असतात आणि एका तासात सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात. OMR शीट दिलेली असते ज्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून त्याला गोल करायचं असतो.

प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असते. या परीक्षेत गुण नकारात्मक पद्धतीने दिले जातात म्हणजे चार चुकीच्या उत्तरांसाठी तुमच्या एका बरोबर प्रश्नाचा मार्क वजा होतो.

आपण MPSC Combine Question Paper Analysis पाहणार आहोत. संपूर्ण पेपरचा विचार करता प्रश्नांची काठीण्यपातळी ही मध्यम ते कठीण या वर्गवारीत बसेल अशीच होती.

विषयानुसार प्रश्नसंख्या आणि प्रश्नांचे स्वरूप.

MPSC Combine Question Paper Analysis

MPSC Combined Group B 2021 Question Paper Analysis
MPSC Combine Question Paper Analysis
विषयविचारलेल्या प्रश्नांची संख्याकाठिण्य पातळी
इतिहास15मध्यम ते कठीण
भूगोल15सोपे ते मध्यम
राज्यशास्त्र10मध्यम ते कठीण
अर्थव्यवस्था15सोपे ते मध्यम
सामान्य विज्ञान15सोपे ते मध्यम
चालू घडामोडी 15सोपे ते मध्यम
अंकगणित व बुद्धिमत्ता15सोपे ते मध्यम

परीक्षेची काठिण्यपातळी आणि वेळ पाहता परीक्षार्थींना ७०-८० प्रश्न सोडवले असते तर तो एक चांगला प्रयत्न मानला जाऊ शकतो.

परीक्षेचे घटकनिहाय विश्लेषण :

MPSC Combine Question Paper Analysis | महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ प्रश्नपत्रिका विश्लेषण

खाली तुम्हाला MPSC Combine Group B 2021 Prelims Question Paper मध्ये प्रत्येक विषयानुसार विचारलेल्या Sub -Topics विषयी माहिती दिलेली आहे, म्हणजेच त्या त्या विषयावरील कोणकोणत्या Sub -Topics वर आयोगाने Questions विचारलेले आहेत ते Sub -Topics दिलेले आहेत.

➢ इतिहास –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims History Syllabus: इतिहास -आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

१) समाजसुधारक – रानडे (जन्म १८४२- १७८ वर्षे पूर्ण) , फिरोजशहा मेहता (जन्म- १८४५, त्यामुळे १७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा प्रश्न विचारला गेला)
२) धार्मिक सुधारणा चळवळ – प्रार्थना समाज ( स्थापना १८६७ – १५३ वर्षे), परमहंस सभा
३) दख्खनचे दंगे
४) महाराष्ट्रातील १८५७ चा उठाव
५) ब्रिटिश गव्हर्नर
६) दळणवळण- टेलिग्राफ
७) कामगार संघटना- सोराबजी शापूरजी
८) स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग
९) शिक्षण
१०) मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ
११) रेल्वे मंडळ
१२) महात्मा फुले सहकारी
१३) महात्मा गांधी- राष्ट्रीय चळवळ

➢ भूगोल –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Geography Syllabus: भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

१) सिंधू नदी करार- चालू घडामोडी भारत
२) लोहखनिज प्रकार- खनिजे भारत
३) खिंडी/घाट- भारत प्राकृतिक
४) मृदाप्रकर- भारत महाराष्ट्र
५) व्याघ्रप्रकल्प- वन्यजीव भारत
६) लोकसंख्या- २००१ भारत
७) लोकसंख्या-घनता महाराष्ट्र
८) महाराष्ट्र लिंग गुणोत्तर -लोकसंख्या महाराष्ट्र
९) मावळ प्रदेश-महाराष्ट्र प्राकृतिक
१०) टेकड्या – महाराष्ट्र प्राकृतिक
११) लोकसंख्या घनता- गडचिरोली महाराष्ट्र
१२) थंड हवेचे ठिकाण – महाराष्ट्र पर्यटन
१३) औष्णिक वीज केंद्रे-महाराष्ट्र ऊर्जासंपत्ती
१४) घाट – महाराष्ट्र प्राकृतिक
१५) नदी- क्रम- महाराष्ट्र नद्या

➢ राज्यशास्त्र –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Polity Syllabus: नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).

१) संविधान सभा- राज्यघटनेवर स्वाक्षरी, इतर देशाकडून घेतलेल्या गोष्टी
२) प्रस्तावना/सरनामा
३) भारतीय संघराज्य पद्धती- मते
४) पंचायत राज- ग्रामसभा
५) पंचायत राज – ग्रामपंचायत कामकाज
६) कायद्याचे राज्य संकल्पना
७) राज्यपाल- पंछी आयोगाच्या राज्यपाल पदाविषयी शिफारशी
८) राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान- चालू घडामोडी संबंधित
९) लोकलेखा समिती
१०) लोकपाल- चालू घडामोडी संबंधित

➢ अर्थव्यवस्था –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Economics Syllabus: भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

१) हरितक्रांती नंतर झालेली उत्पादन वाढ
२) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
३) केंद्र सरकारची थकीत देयता
४) चौदावा वित्त आयोग
५) भारत- उद्योग
६) राष्ट्रीय उत्पन्नातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा- १९५०-५१ ते २०१३-१४
७) दारिद्र्य- तेंडुलकर समिती
८) राष्ट्रीय लोकसंख्या धोरण
९) विश्व व्यापार संघटना
१०) पंचवार्षीक योजना
११) निर्यात क्षेत्र हिस्सा
१२) भारत निर्माण कार्यक्रम
१३) पेमेंट बँक
१४) दारिद्र्य – रंगराजन कमिटी
१५) ऑक्सफॅम अहवाल

➢ विज्ञान –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Science Syllabus: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

१) खगोलीय पराशर पद्धत
२) सोलर सेल कार्य
३) खगोलशात्र आणि बीजगणित
४) कॉपर जर्मन सिल्वर धातूमिश्रित
५) स्फटिक पदार्थ गुणधर्म
६) आवर्त सारणी रचना
७) पाच किंग्डम
८) मलेरिया आजार
९) आफ्रिकन sleeping सिकनेस
१०) algae आणि fungi
११) झाडांचे रोग
१२) शैवाल
१३) जिवाणू
१४) खाद्य विषबाधा
१५) संशोधन संस्था

➢ चालू घडामोडी –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Current Affairs Syllabus: जागतिक तसेच भारतातील.

१) व्यक्तिविशेष – क्रिस्टिना कोच, प्रभात कोळी, हरीश साळवे, विनया शेट्टी
२) पुरस्कार
३) सरकारी योजना
४) माहिती तंत्रज्ञान
५) नाट्य संमेलन
६) पर्यावरण
७) विविध रिपोर्ट
८) राजकीय
९) विज्ञान तंत्रज्ञान मधील चालू घडामोडी

➢ अंकगणित आणि बुद्धिमत्ता –

MPSC Combine Question Paper Analysis: Prelims Math & Reasoning Syllabus:

बुध्दिमापन चाचणी: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी.

१) अंकमालिका
२) शब्दसमूह
३) घनाच्या बाजू
४) कागदाची घडी
५) युक्तिवाद
६) माहिती कोडे
७) विधान आणि करणे
८) दिशा
९) टक्केवारी
१०) वर्तुळाचे क्षेत्रफळ
११) काळ काम वेग
१२) वयवारी
१३) सूट
१४) नाणी

MPSC Combine Question Paper Analysis या Topic वर दिलेली माहिती कशी वाटली हे खाली Comment Box मध्ये नक्की कळवा, MPSC च्या अभ्यासासाठी इतर माहिती हवी असल्यास नक्की Comments च्या माध्यमातून कळवा.

1 thought on “MPSC Combine Question Paper Analysis | महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ प्रश्नपत्रिका विश्लेषण”

  1. Thank you so much.
    It is very helpful for me.
    So can you share information about,
    Combine mains paper no 2 2021
    questions paper analysis?

    Reply

Leave a Comment