MPSC Geography Prelims Question Papers Analysis

MPSC Geography Prelims Question Papers Analysis : MPSC ची कुठलीही Exam असो Geography हा विषय तितकाच महत्वाचा आहे जितके इतर सर्व Subjects त्यामुळे भूगोलाचे MPSC Geography Prelims Question Papers Analysis अभ्यासणे देखील खूप महत्वाचे ठरते.

मात्र विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या मुद्द्यांना गृहीत धरून त्याचप्रमाणे Syllabus व दिलेल्या मुद्द्यांच्या निगडित सर्व Topics व त्याचे Sub Topics आणि MPSC Geography Prelims Question Papers Analysis अभ्यासणे अनिवार्य आहे.

MPSC Prelims Geography Syllabus

Syllabus :

महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल- प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.

(Maharashtra, India and World Geography-Physics Social, Economic Geography of Maharashtra, India, and World)

मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण:-
घटकनिहाय प्रश्न:

MPSC Geography Prelims Question Papers Analysis

MPSC Geography Prelims Question Papers Analysis या घटकात 2013 ते 2019 या सलग वर्षांत MPSC Prelims Exam मध्ये भूगोल या विषयावर विचारण्यात आलेले सर्व प्रश्न हे येथे सांगितल्या प्रमाणे याच Topics वर होते.

त्यामुळे MPSC Geography Prelims Question Papers Analysis अभ्यासणे खूप महत्वाचे ठरते. येथे दिलेले MPSC Geography Prelims Question Papers Analysis हे भूगोल या विषयाच्या Sub Topics नुसार विभाजित करून सांगितलेले आहे.

geography mpscstudy.in Copy

2013

  • अग्नीकंकणाचा भाग, नदीचे भूरूप, जागतिक तापमानवाढ, विषुववृत्तीय हवामान, नदी खोऱ्यांचा उतरता क्रम, जलविभाजक (नकाशा), गारो खासी,जैतिया टेकड्या (नकाशा), मृदेची धूप, गाळाची मृदा, पूर पातळी, ढगफुटी, प्राणी संपत्ती, उसापासून साखर, मुंबई हाय तेलक्षेत्र, कृषी क्षेत्राची उपलब्धता.

2014

  • ज्वलामुखीचे प्रकार, सौर ऊर्जा, वनांचे प्रकार, सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य, नदी व धबधबे, निलगिरी पर्वत, विविध आखात, एन्नोर बंदर, स्थलांतरित शेती, चहा वनस्पती, आदिवासी जमाती, तिज सण.

2015

  • पृथ्वीचे अंतरंग, ज्वालामुखी भूरूपे, बारमाही नदी, कोलोरेडो नदी, कललेले पठार, त्सुनामी, मुगा रेशीम उत्पादन, सुवर्ण क्रांती, ज्योतिर्लिंगे, आफ्रिका खंड, व्हॅटिकन सिटी, मंगळ ग्रह.

2016

  • एल-निनो, वनांचे प्रकार, घागरा नदी, हिमालयातील शिखरे, वाळवंट, पृथ्वीचे परिवलन, राष्ट्रीय महामार्ग, सूती कापड गिरणी, निन्गोल चाकौवा, सरहुल, नुआखाई, लोहरी सण, अनुवा जमात, जलविद्युत प्रकल्प, भारताची भूसीमा, टिटिकाका सरोवर.

2017

  • पृथ्वीचे अंतरंग, भूकंप, ला निनो, सांद्रीभवन, संप्लवन, त्रिवार्थाचे हवामान वर्गीकरण (नकाशा)
  • स्थानिक वारे(नकाशा), बोरा वारे (Wind and Their Types)
  • नदी व उगम, पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धान्त, ऋतू व दिनांक, समुद्राची क्षारता, बेटांना विभागणाऱ्या रेषा
  • सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे, सरहूल महोत्सव, शास्त्रीय नृत्य, बेटे व वैशिष्ट्ये, वारे (प्रकार)

2018

  • ज्वालामुखी भूरूपे, भू-अंतर्गत हालचालही, रासायनिक विदारण, सापेक्ष आणि निरपेक्ष आर्द्रता, समताप रेखा, पर्जन्यछायेचा प्रदेश, गरदीय वारे.
  • हिमालयातील व द्वीपकल्पीय नद्या, पृथ्वीचे फिरणे, सागराची क्षारता, मासेमारी,
  • भूगोलत्रिज्या (Earth diameter), किनारपट्टीचा प्रदेश, भारताचे स्थान, (longitude and latitude).

2019

  • भूखंड वाइनाचा सिद्धांत, पृथ्वीचे अंतरंग, खडकांचे प्रकार, भूरूपे (आकृत्य), भू-धवलता, स्थानिक वारे, ईशान्य मान्सून वारे (नकाशा), निर्वनीकरण,
  • नदी व काठावरील शहरे, दख्खनचे पठार, मृदा प्रकार, वाहतूक, महाराष्ट्रातील पहिले, महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार.

संदर्भ

  • 5 ते 12 वी स्टेट बोर्ड
  • NCERT 10, 11, 12 वी
  • महाराष्ट्रचा भूगोल- खतीब किंवा दीपस्तंभ प्रकाशन
  • भूगोल व पर्यावरण- ए. बी. सवदी
  • पर्यावरण- तुषार घोरपडे
  • ऑक्सफोर्ड शालेय Atlas (Maps च्या अभ्यासासाठी)

आपण भूगोल विषयातील घटकांनुसार जुन्या UPSC प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न व त्यासंबंधीची रणनीती पाहणार आहोत. UPSC Exam मधील Geography या विषयातील काही प्रश्ने घेण्या मागचा उद्देश हाच आहे कि आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्न विचारण्याचा दृष्टिकोन हा संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आहे, आणि हा लेख वाचल्यामुळे प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांचा देखील नक्कीच बदलेल.

सामान्यतः भूगोलाचा अभ्यास करताना पुढील प्रमुख घटक आढळतात

(१)प्राकृतिक रचना, (२) हवामान, (३) नदीप्रणाली, (४) मृदा, (५) वने, (६) कृषी, (७) उद्योग, (८) नैसर्गिक साधनसंपत्ती (विशेषतः ऊर्जा, खनिज, जल इ.), (९) लोकसंख्या, (१०) वसाहत, (११) पर्यावरण व नैसर्गिक आपत्ती. या प्रत्येक घटकातील प्रश्नाचा आढावा आपण घेणार आहोत.

यापैकी प्राकृतिक रचना या घटकापासून आपण सुरुवात करू. या घटकावर गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये पुढील प्रश्न विचारण्यात आले होते.

(1) हिमालयातील भूस्खलनाचे प्रमाण जास्त आहे. कारणांवर चर्चा करा आणि थांबवण्यासाठी योग्य उपाय सुचवा. (2016 – 12 marks)

(2) इंडोनेशियन आणि फिलिपिन्स द्वीपसमूहातील हजारो बेटांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण द्या. (2012-10 marks)

(3) जगातील fold mountains systems खंडांच्या सीमेवर का आहेत? fold mountains आणि भूकंप व ज्वालामुखींचे जागतिक वितरण दरम्यानचे संबंध स्पष्ट करा. (2014-10 marks)

(4) पश्चिम घाटाच्या नद्यांनी डेल्टासची निर्मिती होत नाही. (2013-5 marks)

(5) पश्चिम घाटांपेक्षा हिमालयात भूस्खलनांच्या वारंवार घटनेची कारणे सांगा.
(2013 – 5 marks)

वरील पाच प्रश्नांचा विचार केल्यास असे स्पष्ट होते की, पहिला व पाचवा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे; तर उर्वरित तिन्ही प्रश्न मूलभूत संकल्पनांवर आधारित आहेत.

थोडक्यात प्राकृतिक रचना घटकावर संकल्पनात्मक प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते. जर त्या कालावधीत एखादी घटना की जो भूरूपशास्त्रीय प्रक्रियांशी संबंधित घडली तर त्यावर चालू घडामोडींच्या स्वरूपात निश्चितच प्रश्नविचारला जातो.

प्रश्न क्र.१ – हा प्रश्न थेट स्वरूपाचा व वर्णनात्मक आहे. हिमालयामध्ये वारंवार घडणाऱ्या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तराचे दोन प्रमुख भाग असतील व दोन्हीस समान गुण असतील.

प्रथम हिमालयामध्ये भूस्खलनाचा धोका जास्त का आहे याचे कारणासह स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व कारणांचा समावेश झाला पाहिजे.

उदा. (१) हिमालयाची उंची, त्यामुळे उताराची तीव्रता, (२) हिमालयातील खडकाचा प्रकार-स्तरीत खडक, (३) हिमालयातील खडकावर कार्यरत तीव्र स्वरूपाची भूअंतर्गत बले- दाबजन्य बले उत्तराच्या समारोपामध्ये दोन्ही पर्वतांतील त्यामुळे येणारा ठिसूळपणा, (४) हिमालयाच्या रांगांमधील पर्जन्याचे स्वरूप.

या मुद्द्यांचे स्पष्टीकरण शब्दांमध्ये संकल्पनात्मक रीतीने करणे आवश्यक आहे व सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे या कारणांव्यतिरिक्त मानवी हस्तक्षेप, पर्यावरणाचा हास. घटकांचा परिणाम विशद करावा.

त्यानंतर प्रश्नाच्या उर्वरित भागामध्ये त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट करावे. त्यामध्ये मूलभूत उपाय व प्राधान्याने मानवी हस्तक्षेप नियंत्रित करण्याचे मार्ग, वनीकरण, विकास प्रकल्प मर्यादित ठेवण्याचे मार्ग स्पष्ट करणे अपेक्षित आहे.

थोडक्यात, पर्यावरण ऱ्हास व मानवी हस्तक्षेप याचा परिणाम ठळकपणे मांडणे आवश्यक आहे. प्रश्न क्र.५- हा प्रश्न देखील भूस्खलनाशी संबंधित आहे. मात्र या उत्तरामध्ये तुलनात्मक मुद्दे मांडणे आवश्यक आहे.

उत्तरामध्ये पश्चिम घाट व हिमालयामधील भूस्खलनाशी संबंधित कारणे तुलनात्मक पद्धतीने मांडणे आवश्यक आहे. यामध्ये दोन्ही पर्वतांचा उतार, खडकांचा प्रकार, पर्वतांवर कार्यरत बले, पर्वतांमधील पर्जन्याचे स्वरूप, दोन्ही पर्वतांमधील मानवी हस्तक्षेप या घटकांचे तुलनात्मक स्पष्टीकरण आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप व त्याचा परिणाम याबाबत मत मांडणे आवश्यक आहे.

प्रश्न क्र.२,३,४-या प्रश्नांचा विचार केल्यास हे प्रश्न थेट संकल्पनांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा चालू घडामोडींशी संबंध नाही.

या प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांनी संबंधित संकल्पना, आवश्यक असल्यास तिचे उपयोजन अचूकपणे योग्य शब्दांमध्ये मांडणे आवश्यकअसते.या प्रश्नांची उत्तरे लिहिताना आकृती व नकाशा या दोन्हींचा वापर आवश्यक असतो.

प्रश्न क्र. 2 व 3 – हे दोन्ही प्रश्न भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतावर (Plate Tectonic Theory) आधारित आहेत. प्रश्न क्र.२ उत्तराच्या पहिल्या परिच्छेदामध्येच या संकल्पनेचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

उत्तराच्या मुख्य भागामध्ये (गाभा) इंडोनेशिया व फिलिपाइन्स द्वीपकल्पांचे भूपट्टांच्या सीमेवरील स्थान, त्या ठिकाणची भूपट्टांची हालचाल, त्या प्रकारच्या हालचालींचा परिणाम आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करावा.

तसेच नकाशावर देखील तोप्रदेश व भूपट्टांच्या सीमा दाखवाव्यात. या उत्तरामध्ये आकृतीचे स्थान उत्तराचा मुख्य भाग (गाभा) सुरू करण्याआधी असावे.

या सर्व स्पष्टीकरणामध्ये भूपट्टविवर्तनिकी सिद्धांताची माहिती थोडक्यात, अचूक शब्दांत देणे आवश्यक आहे. प्रश्न क्र.३- हा प्रश्न देखील भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांतावरच आधारित आहे.

या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये घडीच्या पर्वतांचे स्थान व त्याच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रॉकी, अँडीज या पर्वतांची उदाहरणे आकृती व नकाशासह देऊन, भूपट्टांची हालचाल कशा प्रकारे घडीच्या पर्वतांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते.

हे सविस्तर स्पष्ट करणे अपेक्षित आहे. प्रश्नाच्या दुसऱ्या भागामध्ये घडीच्या पर्वतांचे स्थान व तेथील भूकंप, ज्वालामुखीचा धोका यांचा सहसंबंध स्पष्ट करावा.

त्याकरिता हिमालय पर्वताचे उदाहरण देऊन आकृतीच्या साहाय्याने भूपट्टहालचाल या घटनांना कशा प्रकारे कारणीभूत आहे ते स्पष्ट करावे. वरील दोन्ही प्रश्नांमध्ये (प्रश्न क्र.२ व ३) उत्तरामध्ये तुटकपणा जाणवता कामा नये.

उत्तर वाचताना आकृतीच्या मदतीने प्रक्रिया डोळ्यांसमोर उभी राहणे आवश्यकआहे. याकरिता लेखन कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे. प्रश्न क्र.4- हा प्रश्न देखील संकल्पनात्मकआहे.

या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सर्वप्रथम त्रिभूज निर्मितीस आवश्यक घटक कोणते आहेत त्याचे स्पष्टीकरण देऊन, हे घटक पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्यांबाबत कसे प्रतिकूल आहेत याचे स्पष्टीकरण द्यावे. या प्रश्नामध्ये पश्चिम घाटातील नद्या असा उल्लेख आहे.

त्यामुळे उत्तरामध्ये पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशेस वाहणाऱ्या नद्यांबाबत स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. वरील सर्व प्रश्न व त्याची संभाव्य उत्तरे, उत्तरांमधील घटक विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यासास योग्य दिशा द्यावी.

1 thought on “MPSC Geography Prelims Question Papers Analysis”

Leave a Comment