येथे तुम्हाला MPSC Rajyaseva च्या मागील वर्षाच्या 2013-2019 पर्यंत झालेल्या सर्व MPSC Question Papers चे अगदी Detail मध्ये Analysis दिलेले आहे. MPSC Question Paper Analysis हे खाली दिलेल्या त्या त्या सुबजेक्ट च्या लिंक वर click करून आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण काळजीपूर्वक Read करा. मात्र त्या आधी अभ्यास करताना किव्हा कुठलाही विषय अभ्यासताना नेमका आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे या बद्दल मी खाली अगदी Detail मध्ये सांगितले आहे ते आधी नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच त्या त्या विषयाच्या Link वर क्लिक करा.
Economics: MPSC Previous Year Question Papers Analysis
Link: Economics पेपर विश्लेषण
आपण Economics या Subject वर आयोगाने मागील २०१३ ते २०१९ पर्यंत mpsc राज्यसेवा exam मध्ये विचारलेल्या सर्व question papers चे Analysis पाहणार आहोत ते सुद्धा अगदी to the point, आणि Detail मध्ये तर त्याआधी मला काही महत्वाचे सांगायचे आहे, जेव्हा आपण Economics या विषयाचे पाठीमागचे questions पाहत असतो त्यावेळीस आता किव्हा भविष्यात आयोग त्या Topic वरती कसा प्रश्न विचारू शकतो या दृष्टीने आपण मागील question papers पाहायचे असतात.
ज्या प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत त्या प्रकारचे प्रश्न फार क्वचितच किव्हा एखाद्या वेळेस जसाचा तसा विचारला जाऊ शकतो मात्र काही प्रश्न असे असतात कि ज्या प्रश्नांच्या आजूबाजूची माहिती आपण पाहतो तर तीच माहिती next year ला परीक्षेत पाहायला किव्हा विचारलेली असते त्यामुळे हा दृष्टिकोन ठेऊन आपल्याला ह्या सर्व Topics/Subjects चा अभ्यास करायचा आहे.
Topics लिस्ट दिलेली आहे जी खूप Important आहे.
MPSC Geography : Analysis of Previous Year Question papers
भारताचा भूगोल
1 प्राकृतिक भूगोल 2) नदी प्रणाली 3) हवामान 4) वने 5) खनिजसंपत्ती 6) भारतातील प्रमुख जनजाती 7) वाहतूक
Link: Geography पेपर विश्लेषण
जगाचा भूगोल
1) सूर्यमाला 2) पृथ्वी 3) अक्षवृत्त व रेखावृत्त 4) आंतरराष्ट्रीय वार रेषा 5) पृथ्वीची उत्पत्ती व विकास 6) पृथ्वीच्या उत्पत्तीसंबधी सिद्धांत / परिकल्पना 7) पृथ्वीचे थर 8) भूकंप 9) ज्वालामुखी 10) वातावरणाचे थर 11) जगातील प्रमुख पर्वत रांगा 12) जगातील पर्वत श्रेण्यामधील उंच शिखरे 13) जगामधील प्रमुख पठार 14) जगामधील महत्वाची मैदाने 15) जगामधील महत्वाच्या सामुद्रधुनी 16) जगामधील प्रमुख सरोवरे 17) जगातील महत्वाचे धबधबे 18) जगातील महत्वाच्या भुशिर 19) जगातील महत्वाचे व्दीपसमुह 20) जगातील महत्वाचे बेटे 21) व्दीपसमुह 22) जगातील महत्वाचे वाळवंट 23) जगातील महत्वाचे गवताळ प्रदेश
महाराष्ट्राचा भूगोल
१) राजकीय आणि प्रशासकीय विभाग २) प्राकृतिक भूगोल ३) महाराष्ट्र नदी प्रणाली ४) महाराष्ट्र हवामान ५) वने ६) खनिजसंपत्ती ७) लोकसंख्या ८) महाराष्ट्र जनगणना २०११ ९) स्थलांतर १०) ग्रामीण वसाहती व तांडे ११) मृदा आणि जलसिंचन १२) कृषी आणि ऊर्जा संपत्ती १३) वाहतूक आणि प्रार्थना स्थळे
MPSC Question Paper Analysis : Polity
Polity या subject वरती जवळपास १८ ते १९ Questions विचारली जातात आणि यात १० ते १२ प्रश्न Current related असतात, खाली Topics लिस्ट दिलेली आहे जी खूप Important आहे.
1) घटनानिर्मिती 2) प्रस्तावना 3) संघराज्ये राज्यक्षेत्रे 4) नागरीकत्व 5) मुलभूत हक्क 6) मार्गदर्शक तत्वे 7) मूलभूत कर्तव्य 8) घटनादुरुस्ती 9) राष्ट्रपती 10) प्रधानमंत्री मंत्रिमंडळ 11) महान्यायवादी 12) संसद 13) न्यायव्यवस्था 14) राज्यपाल 15) ३७१ कलम 16) मुख्यमंत्री मंत्रिमंडळ 17) महाधिवक्ता 18) राज्यविधिमंडळ ( combine साठी महत्वाचा टॉपिक)
Link: Polity (राज्यव्यवस्था ) पेपर विश्लेषण
19) केंद्र राज्य संबंध 20) आंतरराज्यीय संबंध, कलम २६२, लवाद स्थापन वर्ष, कायमस्वरूपी लवाद, कलम २६३, आंतरराज्यीय परिषद, विभागीय परिषद, कलम ३३१( SC ), 21) आणीबाणी, S.R बोम्मई खटला, आणीबाणी असताना- मूलभूत हक्कासोबत तुलना करा, 22) केंद्रशासित प्रदेश- सर्व कलमे पाहायची आहे, दिल्ल्ली बद्दल माहिती ( निवडणूक ) J&K आणि लद्दाख, दिव दमण आणि DNH, 23) भाषा, कलम ३४८, अभिजात भाषा, ८ वे परिशिष्ट, तूल्लू भाषा विशेष, 24) परिशिष्टये, तिसरे-शपथ, आठवे-भाषा (एकूण २२ परिशिष्टये) 25) सूची, केंद्रसुची, राज्यसूची, सामावर्तीसूची (Combine साठी महत्वपूर्ण टॉपिक) 26) आयोग नीती आयोग, मागासवर्गीय आयोग कलाम ३४१, कलाम ३३८ B, मानवाधिकार आयोग, MPSC , UPSC, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, 27) L.S आणि V.S मध्ये — SC ST यांच्या जागांची मुदतवाढ देणाऱ्या घटनादुरुस्त्या.
विज्ञान (Science) राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण
हे लक्ष्यात असू द्या कि MPSC राज्यसेवा Exam मध्ये Science या विषयावर २० ते २२ Questions Science and Technology या विषयावर असतात त्याचबरोबर Cobined Exam मधे सुद्धा १० ते १२ किव्हा कधी कधी १५ Questions देखील विचारतात त्याच्यामुळे आपले येथे १० तरी Questions Secure झाले पाहिजेत व्यवस्थित Marks पडले पाहिजेत
या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, या तुमचा journey मधे नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु अभ्यास तुम्हालाच करायचा आहे फक्त आम्ही तुम्हाला guide करू शकतो कि नेमकं काय वाचायचं याबद्दल आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो.
Link: विज्ञान (SCIENCE) पेपर विश्लेषण
Science या विषयात आपल्याला ६ Sub Topics अभ्यासायचे आहेत
१)भौतिकशास्त्र
२)रसायनशास्त्र
३)प्राणिशास्त्र
४)वनस्पतीशास्त्र
५)मानवीशरीररचना
६) आरोग्य शास्त्र
याबद्दल मी Detail माहिती MPSC Notes या Main Menu मधे माहिती दिलेली आहे त्यामुळे भेट देऊन चेक करत राहा आम्ही लवकरच वरील एक एक Topic Cover करू आधी तुम्ही Science Question Paper Analysis वर दिलेल्या लिंक वर जाऊन व्यवस्थित रीड करून घ्या.
इतिहास (HISTORY) राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण
Link:History पेपर विश्लेषण
1) प्राचीन भारताचा इतिहास
1) अश्म युग 2) हडप्पा सभ्यता 3) वैदिक काळ 4) महाजनपद काळ 5) नविन धार्मिक चळवळी 6) मौर्य साम्राज्य 7) मौर्योत्तर भारत 8) गुप्त साम्राज्य 9) गुप्तोत्तर काळातील प्रादेशिक सत्ता
2) मध्ययुगीन भारताचा इतिहास
1) मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात 2) प्रादेशिक सत्तांचा उदय 3) देवगिरीचे यादव 4) मुस्लिमांचे भारतात आगमन 5) दिल्ली सल्तनत 6) भारतातील प्रादेशिक सत्ता (१३ वे ते १५ वे शतक) 7) मुघल साम्राज्य 8) मराठा साम्राज्य 9) भक्ती, सूफी व इतर धार्मिक प्रवाह
3) आधुनिक भारताचा इतिहास
1) युरोपियनांचा भारतात आगमन 2) ब्रिटीश सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास 3) जमीन महसुल व्यवस्था 4) शिक्षण 5) वृत्तपत्रे 6) सामाजिक + धार्मिक सुधारणा 7) शेतकऱ्यांचे आंदोलन 8) 1757 – 1857 उठाव 9) 1857 चा उठाव 10) संघटना 11) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 12) बंगालची फाळणी व वंग भंग चळवळ 13) 1914 -1922 टप्पा 14) 1927 – 1935 टप्पा 15) 1937-1947 टप्पा 16) स्वराज्य पार्टी 17) कांतिकारी चळवळ 18) राष्ट्रीय चळवळीत महिलांचे योगदान 19) गव्हर्नर जनरल + व्हाईसरॉय 20) प्रशासकिय विकास + महाराष्ट्र 21) सुभाषचंद्र बोस 22) कामगार संघटना 23) समाजसुधारक + महाराष्ट्राचा इतिहास
Mpsc and upsc all information
Sir could you please analyse the previous years question papers for subordinate services non-gazzeted, group-B eaaminations.
Will upload soon… please do subscribe, when we upload this article you will get notification through email